भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत...
मित्रांनो, लहानपणी शाळेत आपण ही प्रतिज्ञा अभिमानाने म्हणायचो. भारत माझा देश आहे हे शब्द बोलताना उच्चारताना आपल्या मनात देशाबद्दल प्रेम, आदर आणि अभिमान निर्माण व्हायचा.
परंतु आज स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे..
आपण खरंच आपल्या देशावर प्रामाणिक आहोत का...??
👉🏻 बघा, देशभक्ती म्हणजे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवणे, राष्ट्रगीत म्हणणे किंवा सोशल मीडियावर देशभक्तीचे स्टेटस ठेवणे याला देशभक्ती म्हणत नाही...
देशभक्ती आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या कृतींमध्ये दिसली पाहिजे...
👉🏻 आपण नोकरी करतो. व्यवसाय करतो. ऑफिसमध्ये काम करतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा आपण खरंच आपल्या कामाशी इमानदारीने वागतो का..??
कामाच्या वेळेत काम टाळणे, जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे, फसवणूक करणे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे किंवा माझं काय जातंय...???
असा विचार करणे… या सगळ्याचा परिणाम शेवटी आपल्या देशावरच होत असतो...
👉🏻 आपण रस्त्यावर चालतो. हातातला कचरा रस्त्यावर फेकताना आपण एक क्षणही विचार करत नाही. पण त्याच रस्त्यावर घाण दिसली की आपण सरकारला आणि प्रशासनाला दोष देत बसतो...🤷♂️
कचरा रस्त्यावर टाकताना आपल्याला आपला देश का आठवत नाही...??
स्वच्छ भारत फक्त सरकारची जबाबदारी नाही. भारत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
👉🏻 आपल्या घरासमोर स्वच्छता ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे या छोट्या गोष्टीच खऱ्या देशभक्तीची सुरुवात आहे...
आज आपल्या समाजासमोर आणखी एक मोठा प्रश्न आहे जात, धर्म आणि भेदभाव.
आपण म्हणतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग माणूस माणसामध्ये जात-पात, धर्म, भाषा, आर्थिक परिस्थिती यावरून भांडण का करतो...??
👉🏻 रक्ताचा रंग सगळ्यांचा लाल आहे. दुःख सगळ्यांना होते. आनंद सगळ्यांना होतो. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांच्या भविष्याची आणि चांगल्या आयुष्याची इच्छा असते...
मित्रांनो, भारत कोण्या एका जातीचा नाही, कोण्या एका धर्माचा नाही, कोण्या एका भाषेचा नाही.
भारत आपल्या सर्वांचा आहे...
👉🏻 आपण एकमेकांना तोडत राहिलो तर देश मजबूत कसा होणार...??
समाजात द्वेष वाढवत राहिलो तर पुढच्या पिढीला आपण कोणता भारत देणार...??
आपल्याला बदलाची सुरुवात दुसऱ्याकडून नको, स्वतःपासून करावी लागेल.
👉🏻 आपण प्रामाणिकपणे काम करूया. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करूया. कचरा करू नका. वाहतुकीचे नियम पाळूया. गरजू व्यक्तीला मदत करूया. मुलांना चांगले संस्कार देऊया. जात-पात आणि धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याऐवजी माणुसकीला महत्त्व देऊया...
👉🏻 कारण देश बदलण्यासाठी नेहमी मोठ्या क्रांतीची गरज नसते. कोट्यवधी भारतीयांनी आपल्या रोजच्या आयुष्यात केलेल्या छोट्या-छोट्या चांगल्या कृती एकत्र आल्या, तर देश नक्कीच बदलू शकतो.
आपण सरकारकडून चांगल्या भारताची अपेक्षा करतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारूया
मी चांगला नागरिक होण्यासाठी आज काय केले..??
जर प्रत्येक भारतीयाने हा प्रश्न स्वतःला रोज विचारला, तर भारत बदलायला वेळ लागणार नाही...
तिरंगा फक्त हातात नको… तो आपल्या विचारांमध्ये असायला हवा...
👉🏻 देशभक्ती फक्त घोषणांमध्ये नको… ती आपल्या कृतीत दिसायला हवी आणि भारत माझा देश आहे हे फक्त प्रतिज्ञेतील वाक्य न राहता, आपल्या जीवनाची जबाबदारी बनायला हवी...
🇮🇳 चला, फक्त माझा भारत महान म्हणू नका…
आपल्या कृतीतून भारताला महान बनवूया...
15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा...🇮🇳🌹
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697